Tuesday, 7 April 2020

Coronavirus : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे - डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

शिक्षकानों वर्क फ्रॉम होम करताय! ऑनलाईन पध्दतीने होणार मुल्यमापन

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनांमधील शिक्षकांनो, वर्क फ्रॉम होम करीत असाल, तर तंत्र शिक्षण संचालनालय त्याचे मूल्यमापन ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. केलेल्या कामाचा तपशील  द्यावा लागणार आहे. शिक्षकांच्या या कामाची दखल गोपनीय अहवालात घेतली जाणार आहे.

ज्युनिअर वकिलांना मदतीचा हात

पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचा निर्णय

पिंपरी – पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वकिलीची प्रॉक्‍टिस असणाऱ्या वकिलांना लॉकडाऊनच्या काळात अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष ऍड. दिनकर बारणे यांनी दिली.

लॉकडाउनमुळे रखडले कामगारांचे पगार

कंपनी कर्मचाऱ्यांना वाहन पास द्यावेत

पिंपरी – करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे कार्यालयीन कामकाजदेखील ठप्प झाले आहे. त्यामुळे कामगारांचे पगार करणे कठीण झाले आहे. तेव्हा प्रशासनाने याची दखल घेऊन कार्यालय उघडण्यासाठी परवानगी देऊन त्यांच्यासाठी वाहन पास द्यावेत. तसे कंपन्यांना अर्ज करण्यासाठी त्वरित लिंक तयार करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आता घरबसल्या पाठविता येणार मीटर रीडिंग

ग्राहकांसाठी ऑनलाइन वीजबिल भरण्याचा पर्याय उपलब्ध

पिंपरी – करोना संसर्गाला पायबंद घालण्यासाठी शासन स्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीज देयक आकारण्यात येणार आहे. तसेच ग्राहक मोबाइल ऍपद्वारे घरबसल्या मीटर रीडिंग घेऊन त्यानुसारच ऑनलाइन बिल भरू शकतात.

सोसायट्यांच्या दारी ‘एटीएम’ची वारी

पिंपरी – वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीने आणि पंजाब नॅशनल बॅंकेच्या सहकार्याने सध्या “एटीएम आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे.