Thursday, 5 July 2012

भाजपच्या जेलभरो आंदोलनात 91 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31017&To=5
भाजपच्या जेलभरो आंदोलनात 91 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
भारतीय जनता पक्षाने राज्यभर छेडलेल्या जेलभरो आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद लाभला. पिंपरी चौकात रास्ता-रोको करणा-या 91 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हिंजवडी ग्रामंपचायत

हिंजवडी ग्रामंपचायत:
हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आणि पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले हिंजवडी हे गाव. त्याची लोकसंख्या १५ हजार आहे. ग्रामदैवत म्हातोबा याचा वर्षांनुवर्षे चालत आलेला उत्सव हे या गावाचे खास वैशिष्टय़. हा उत्सव बगाड, गळ टोचणे अशा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.
Read more...

७०० कोटींचा खर्च व्यर्थ असल्याची ...

७०० कोटींचा खर्च व्यर्थ असल्याची ...:
‘पिंपरीची घरकुल योजना सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कुरण’
पिंपरी / प्रतिनिधी
दीड लाखात घर देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाकांक्षी घरकुल योजना फसवी असल्याचे उघड झाल्यानंतर आता त्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात राजकारण रंगू लागले आहे. हजार घरांचे वाटप येत्या १५ ऑगस्टला करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने सुरू करताच शिवसेनेने घरकुल योजना म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप केला आहे.
Read more...

PIMPRI CHINCHWAD ANTARANG

PIMPRI CHINCHWAD ANTARANG City's largest marathi weekly newspaperhttp://ww...: PIMPRI CHINCHWAD ANTARANG
City's largest marathi weekly newspaper

http://www.eantarang.com/

पिंपरीतील रस्ते विकास उत्तम - दराडे

http://www.mypimprichinchwad.comपिंपरीतील रस्ते विकास उत्तम - दराडे पिंप...:

पिंपरीतील रस्ते विकास उत्तम - दराडे

पिंपरी, 21 जून

पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतुकीच्या दृष्टीने केलेले रस्ते विकासाचे नियोजन उत्तम असल्याचे गौरवोद्‌गार नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी गुरुवारी (दि. 21) काढले.

मंत्रालयातील आगीनंतर महापालिका जागी

http://www.mypimprichinchwad.comमंत्रालयातील आगीनंतर महापालिका जागी पिंप...:

मंत्रालयातील आगीनंतर महापालिका जागी

पिंपरी, 21 जून

मुंबईतील मंत्रालयातील आगीच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या मालकीच्या सर्व इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणा तपासणीचा निर्णय घेतला आहे.

'घरकुलात' सत्ताधा-यांनी खाल्ले गरीबांच्या टाळूवरचे लोणी ; शिवसेनेचे टीकास्त्र

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30997&To=9
'घरकुलात' सत्ताधा-यांनी खाल्ले गरीबांच्या
टाळूवरचे लोणी ; शिवसेनेचे टीकास्त्र
पिंपरी, 21 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घरकूल योजनेतील सदनिकांचा ताबा देण्यापूर्वीच त्याची दुरवस्था झाल्याचे शिवसेना नगरसेवकांच्या प्रकल्प पाहणी दौ-यातून गुरुवारी (दि. 21) उघड झाले. खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, प्लॅस्टरमधून कोसळणारे सिमेंट, भिंतीना निघालेले पापुद्रे, स्वच्छतागृहांचे तुटलेले कडी-कोयंडे यातून कामाच्या निकृष्ट दर्जाचे दर्शन घडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गरिबांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले असल्याचे कोरडे शिवसेना गटनेते श्रीरंग बारणे यांनी ओढले.