Wednesday, 22 August 2012

'निवारा संरक्षण मोर्चाला' पोलिसांची परवानगी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32568&To=5
'निवारा संरक्षण मोर्चाला' पोलिसांची परवानगी
पिंपरी, 21 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने गुरुवारी (ता. 23) काढण्यात येणा-या निवारा संरक्षण मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे आश्वासन मोर्चाच्या संयोजकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिल्याचे परिमंडळ तीनचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी मंगळवारी (ता.21) पत्रकार परिषदेत सांगितले.

Exclusive UID counters set up

Exclusive UID counters set up: College of Military Engineering (CME) in association with PCMC has set up exclusive Aadhaar Centres to promote the Unique ID card scheme.

Pimpri-Chinchwad has enough water to last a year

Pimpri-Chinchwad has enough water to last a year: The water crisis in the twin-township of Pimpri-Chinchwad is almost over as the catchment area of Pavana dam was filled up to 80% on Monday.

कासारसाई धरण 87 टक्के भरले

कासारसाई धरण 87 टक्के भरले: सोमाटणे - कासारसाई धरणात 87 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या महिनाभरात पवनमावळात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीला वरदान ठरणारे कासारसाई व पवना धरणात पुरेसा पाणीसाठा झाला. त्यामुळे शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. कासारसाई धरण परिसरात आजअखेर 392 मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात 15.40 दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे. धरण 87.67 टक्के भरले आहे. मळवंडी, आढले, पाचाणे ही धरणे यापूर्वीच भरली आहेत.

भाडेकरूंच्या नोंदीसाठी पोलिसांचा जागर

भाडेकरूंच्या नोंदीसाठी पोलिसांचा जागर: पिंपरी/मोशी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गृहसंकुलांत भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची पोलिस ठाण्यात नोंद करण्याबाबत बैठक घेण्यात आली.

साखळी चोरट्यांना साखळदंड

साखळी चोरट्यांना साखळदंड: पिंपरी -&nbsp सोनसाखळी आणि लॅपटॉप चोरीप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली, तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

प्राधिकरणात नगरभूमापन व्हावे

प्राधिकरणात नगरभूमापन व्हावे: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामधील सर्व पेठांच्या मंजूर ले-आऊटमध्ये नगरभूमापन व्हावे, अशी मागणी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.