MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 28 August 2012
वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्य
वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्य: पिंपरी - 'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करू,'' असे आश्वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिले.
दापोडीमध्ये लोहमार्गाला तडे
दापोडीमध्ये लोहमार्गाला तडे: पिंपरी - मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दापोडी स्थानकादरम्यान लोहमार्गाला तडा गेला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजता ती सुरळीत झाली.
मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे
मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे: पिंपरी -  मुंबईहून दुचाकीवर पिंपरी-चिंचवड शहरात यायचे आणि सोनसाखळी हिसकवायची, असा प्रकार इराणी चोरट्यांकडून सुरू असल्याचे सांगवी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
लांडे यांचे वक्तव्य ही "लोणकढी थाप'
लांडे यांचे वक्तव्य ही "लोणकढी थाप': पिंपरी -  पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात कधीही बैठक झाली नसून ती विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यासोबत झाली होती.
...तर महापौरांवर कारवाई करा
...तर महापौरांवर कारवाई करा: पिंपरी -  'अनधिकृत बांधकामांचे समर्थन केल्यामुळे नगरसेवकांवर कारवाई होणार असेल, तर पीठासन अधिकारी म्हणून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याचे आदेश देणाऱ्या महापौर मोहिनी लांडे यांच्यावर प्रथम कारवाई करा,'' अशी मागणी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मोफत झाडे
‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मोफत झाडे: ‘राज्यात शंभर कोटी झाडे लावायचे ‘टार्गेट’ लवकर पूर्ण करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी वनविभाग मोफत झाडे देणार आहे, ’ अशी घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली.
जकातचोरीबद्दल पिंपरी वाघेरे येथील मिळकतीला सील !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32751&To=10
जकातचोरीबद्दल पिंपरी वाघेरे येथील मिळकतीला सील !
पिंपरी, 27 ऑगस्ट
महापालिकेला विक्रीकर विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पिंपरी वाघेरे येथील जमतानी आयर्न अँड ट्रेडींग यांनी 2007-09 या दोन वर्षाच्या कालावधीत 10 लाख 15 रुपयांची जकात चुकविल्याचे उघड झाले आहे. त्यावर जकात शुल्क आणि दहापट तडजोड शुल्क अशी 69 लाख 59 हजार 375 रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस बजावूनही त्याला दाद न दिल्याने महापालिकेने जमतानी यांच्या मालमत्तेला सील ठोकले असल्याची माहिती जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी दिली.

Subscribe to:
Posts (Atom)