Wednesday, 26 June 2013

डॉक्टर आयुक्तांचे 'मिशन आरोग्य'

डॉक्टर आयुक्तांचे 'मिशन आरोग्य': पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहर आरोग्य सेवेच्या दृष्टीने मिशन हाती घेतले असून, भोसरी आणि थेरगाव येथे नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला गती देणार असल्याचे मंगळवारी (२५ जून) स्पष्ट केले.

महापालिकेच्या अधिका-यांना विशेष ...

महापालिकेच्या अधिका-यांना विशेष ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वर्ग  एक आणि वर्ग दोनचे अधिकारी महापालिका सभा, स्थायी समिती सभेवेळी आणि विशिष्ट प्रसंगी एकसारख्याच गणवेशात दिसणार आहेत. गडद निळ्या रंगाची पँन्ट आणि फिकट आकाशी रंगाचा शर्ट असा हा गणवेश असेल.

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन पुढे ...

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन पुढे ...:
भोसरी गावठाणात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेकडून येत्या 1 जुलै रोजी आयोजित लोकशाही दिन पुढे ढकलण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यात 'प्लॅस्टिक बंदी'ची ...

पालखी सोहळ्यात 'प्लॅस्टिक बंदी'ची ...:
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पालखी सोहळा काळात व इतर वेळीदेखील प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी मनसेने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.

भोसरीमध्ये गुरुवारी लिंगायत धर्म ...

भोसरीमध्ये गुरुवारी लिंगायत धर्म ...:
राष्ट्रीय बसव दल व लिंगायत धर्म महासभेच्या पुणे विभागातर्फे उद्या (गुरुवारी) भोसरी येथे लिंगायत धर्म संमेलन आयोजित केली आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सकाळी दहा वाजता हा मेळावा होईल. मेळाव्यात
Read more...

घरकुलाच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा ...

घरकुलाच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा ...:
पर्यावरणाचे कायदेकानून धाब्यावर बसविल्याचा फटका
पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कायदेकानून धाब्यावर बसविल्याने महापालिकेच्या स्वस्तात घरकुल प्रकल्पापुढील अडचणी वाढतच आहेत. चिखलीमध्ये सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रकल्प राबविताना मलनि:सारण आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे बंधनकारक असताना

भोसरी गावठाण पोटनिवडणुकीसाठी 18 ...

भोसरी गावठाण पोटनिवडणुकीसाठी 18 ...:
भोसरी गावठाण प्रभागामध्ये येत्या 7 जुलैला होणा-या पोटनिवडणुकीसाठी 18 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण 17 हजार 101 मतदार या प्रभागात आहेत.