Saturday, 27 July 2013

पुण्यातील ८० उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र

महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा तपशील मुदतीत न देणाऱ्या पुण्यातील ८० व पिंपरी-चिंचवडमधील ७८ उमेदवारांना पुढील तीन वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत.

औद्योगिक मंदीचे सावट आणि 'शट डाऊन'

काम कमी झाल्याने छोटे-मध्यम उद्योगही अडचणीत
मंदीमुळे बाजारपेठेत वाहनांना मागणी नसल्याने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीच्या चाकण प्रकल्पातील 22 ते 27 जुलै दरम्यान जाहीर केलेला 'शट-डाऊन' संपत आलेला असतानाच टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी-चिंचवडमधील कार प्लँटमध्येही सहा दिवसांचा 'ब्लॉक

वाल्हेकरवाडी येथून पीएमपीएमएलची ...

पीएमपीएमएलच्या वतीने रावेत आणि वाल्हेकरवाडीसह परिसरात बस सुरू करण्यात आली आहे. बस सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या चिंचवड किवळे मंडलातर्फे गुरुवारी (दि. 25 चिंचवडगाव येथील बसथांब्यावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्याची दखल घेत ही बससेवा आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात आली

आयुक्तांच्या 'कारणे दाखवा'ला तीन महिन्यानंतर उत्तर

आरोग्य निरीक्षकाच्या खातेनिहाय चौकशीचे दोषारोपपत्र तब्बल चार महिने उशिरा सादर केल्याप्रकरणी क प्रभागाचे प्रभारी प्रभाग अधिकारी दत्तात्रय फुंदे यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. 15 दिवसात याबाबतचा खुलासा करण्याचे आदेशही दिले. मात्र, फुंदे यांनी या नोटीशीला तीन महिन्यानंतर उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी

बूथ विस्तारातून कार्यकर्त्यांनी ...

भाजपाची भोसरी विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी  
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करताना स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने बुथ विस्तार करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत घराघरात जाऊन माणसे जोडण्याचे

'भक्ती-शक्ती चौकात खाद्यपदार्थ ...

महापालिकेच्या भक्ती-शक्ती उद्यानाजवळ कायमस्वरूपी खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भक्ती-शक्ती हातगाडी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महापौर मोहिनी लांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  महापालिकेने निगडी

सुट्टीच्या दिवशी वीजबिलभरणा ...

वीजग्राहकांच्या सोयीसाठी पुणे परिमंडळामधील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणची सर्व वीजबिल भरणा केंद्र  शनिवारी ( दि.27) व रविवारी (दि. 28) रोजी सुरु राहणार आहेत.
महावितरणच्या वतीने वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील महावितरणाचे आणि इतर अधिकृत वीजबिल भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळात सुरु राहतील.