Saturday, 9 September 2017

[Video] ​​​​#SankalpSeSiddhi explained! Powerful thought provoking message by Roseland society

​​#SankalpSeSiddhi When your Society/Mohalla/Area/Sector becomes your HOME (संकल्प) then only we can achieve #SwachPimpriChinchwad #SwachBharat (सिद्धी) 

Click above title to redirect to video



निर्माल्य दानावर कंपोस्ट खत मोफत

– महापालिका पर्यावरण कक्षाचा उपक्रम : 680 कुटुंबांना वाटप
पिंपरी – गणेशोत्सवात जमा झालेले निर्माल्य दान करून त्यावर मोफत एक किलो कंपोस्ट खत देण्याचा अभिनव उपक्रम महापालिका पर्यावरण कक्ष, बीव्हीजी आणि पर्यावरण संवर्धन समितीने राबविला. यामध्ये 680 कुटुंबांना कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.

Union minister Nitin Gadkari to inaugurate golden jubilee celeberations of CIRT in Pune

Union minister for road transport and highways Nitin Gadkari will inaugurate the Golden Jubilee Celebrations of Central Institute of Road Transport (CIRT), Pune, Bhosari on September 8 at 10 am.

नितीन गडकरींकडून नदी सुधारसाठी मदत होणार – एकनाथ पवार

पिंपरी-चिचंवड शहरातून पवना, इंद्रायणी मुळा नदी वाहतात. या नद्यांसाठी नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार असून त्यासाठी केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मदत होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली. स्थानिक भाजप पदाधिका-यांनी त्यांना विनंती केल्यानंतर लवकरच नदी सुधार प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.

देशात बावीस लाख “ई-बाईक’ धावणार – नितीन गडकरी

पिंपरी – उत्तम चालक निर्मितीसाठी येत्या आठवड्यामध्ये देशभरात दोन हजार “ड्रायव्हींग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सुरू करण्यात येणार आहेत. सुमारे बावीस लाख “इलेक्‍ट्रिक बाईक’ आणण्यात येणार आहे. त्या दुचाकींना ऑटो रिक्षा, टॅक्‍सीप्रमाणे प्रवासी वाहतुकीचे परवाने दिले जातील, अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवारी) भोसरी येथे दिली.

‘सुपर स्पेशालिटी’चे ‘तीनतेरा’

अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे डॉक्‍टर मेटाकुटीला
पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील मेडिसीन विभागाप्रमाणे शस्त्रक्रिया विभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र, प्रशानासाच्या दुर्लक्षामुळे सुपर स्पेशालिटी असलेल्या या रुग्णालयाच्या कामकाजाचे तीनतेरा वाजले आहेत. डॉक्‍टरांची कमतरता, अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव यामुळे येथील डॉक्‍टर मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे शस्त्रक्रियेसाठी सर्वसामान्य रुग्णांना कित्येक आठवडे ताटकळत राहावे लागते. दुसरीकडे वशिल्याच्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जाते. 

स्वस्त धान्य दुकानांत रॉकेल सर्वांना मिळणार

पुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सरकारी कंपन्यांचे एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडरही या दुकानांत मिळणार आहेत. या योजनेस सरकारने नुकतीच मान्यता दिल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी दिली.