Saturday, 27 January 2018

चिमुकल्यांनी केला उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर निगडी-प्राधिकरण येथील गुरुकुल नर्सरीतील चिमुकल्यांनी व शिक्षकांनीही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. गुरुकुल नर्सरीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. हातात तिरंगा घेत येथील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

चिमुकल्यांनी केला उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

[Video] देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज असा उभा राहिला ...!


पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने देशातील सर्वात उंच म्हणजे १०७ मिटर उंचीवर राष्ट्रध्वज निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात उभारला असून यासाठी २.४ कोटी रुपये खर्च आला असून राष्ट्रध्वज उभा करण्यासाठी ३ महिन्याचा वेळ लागला असल्याची माहिती पिंपरी पालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी दिली

Civic bodies have to draft reports on project delay

PIMPRI CHINCHWAD: Municipal corporations have been asked to prepare detailed project reports on development works being delayed because of non-availability of land.

Crackdown time to tame errant drivers

PIMPRI CHINCHWAD: Officials in Pimpri Chinchwad will now be cracking down on traffic rule violators — those parking vehicles haphazardly, violating no-entry rules, carrying autorickshaws carrying more passengers than is allowed and private vehicles plying in BRTS lanes.

[Video] पाणी दरवाढीवरून राजकारण पेटले ....

पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील प्रत्येक कुटुंबाला ६००० हजार ली . मोफत पाणी देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला असला तरी इतर म्हणून प्रत्येक कुटुंबाला महिना २०० रु . आकारणी आकारणी व ६००० हजार ली . पुढच्या पाणी वापरास ५ टक्के दरवाढ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.

जुनी सांगवीत तृतीय पंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत विविध सामाजिक संस्था, शाळांमधून प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थानिक नगरसेवक संतोष कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, शारदा सोनवणे यांनी उपस्थिती लावली.  

पुण्यातील ५ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक

पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत पाच अधिकारी, तर महाराष्ट्र राज्य कारागृह विभागातील सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.