मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडलेल्या गंभीर अपघातांची माहिती महामार्ग पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 4 October 2018
पाच महिन्यांत रिचवली पाच कोटी लिटर दारू
पुणे - शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल चार कोटी ७२ लाख लिटर देशी-विदेशी दारूची विक्री झाली आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत आणि खपामध्ये वेगाने वाढ होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
सीमा भोसले यांना आदर्श शिक्षीका पुरस्कार
नवी सांगवी : शिक्षकदिनानिमित्त लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बालवाडी गटातून दुर्गा बाल विद्यामंदिरच्या सीमा भोसले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सीमा भोसले या 2008 पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडीमध्ये शिक्षिका आहे. त्या सध्या चर्होली बुद्रुक येथे कार्यरत असून त्यांचे लहान मुलांसाठीचे कार्य गौरवास्पद आहे.
पिंपरी चिंचवड शहरात लहान मुली होतायत ‘सॉफ्ट टार्गेट’
हिंजवडी येथील सामूहिक लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य आणि पीडित मुलीचा मृत्यू प्रकरण ताजे असताना पिंपरी येथे सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करून खून, वर्ग शिक्षकाकडून अत्याचार याच बरोबर शहरात बाल लेंगिक अत्याचार सुरू असतानाच आज तर चक्क तडीपार गुंडाने चार वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी प्रकरणातील निष्काळजीपणा, विनयभंग झालेल्या तरुणीची तक्रार घेण्यास टाळाटाळ, आठ दिवस होऊनही त्या मुलीचा आरोपी मोकाट आणि पोलिसांच्या नाकावर ठिचून शहरात फिरणारे तडीपार गुंड आणि त्यांचे कारनामे यावरून शहरात कायदा सुव्यवस्था आहे का नाही?, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे का? आणि तपासी यंत्रणा बिनकामी झाल्या आहेत का? असे अनेक प्रश्न समोर उपस्थित होत आहेत. तर आयुक्तलयाच्या चालू वर्षात तब्बल ११९ बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत.
लायन्सने केली पोलिसांची आरोग्य तपासणी
पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पुणे सफायरच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने पोलिसांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी महाशिबिरात 250 जणांची तपासणी करण्यात आली. चिंचवड येथील पिंपरी पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम पार पडला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उप प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, आनंद मुथा, सत्येन भास्कर, सफायर क्लबच्या अध्यक्षा सरला जॉय, आयोजक अब्दुल जाफर, हरिदास नायर, जॉय जोसेफ, व्ही.एम.कबीर, राजन नायर आदी उपस्थित होते.
एमआयडीसीत ड्रेनेजलाइनचा अभाव
भोसरी - भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. येथून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असूनही महापालिका ड्रेनेजलाइनची सुविधा देत नसल्याने लघुउद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे.
लोहमार्ग दुरुस्तीसाठी चार लोकल रद्द
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या मार्गावर धावणाऱ्या दुपारच्या वेळेतील चार लोकल १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत. पुण्याहून लोणावळ्याला दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता जाणारी लोकल आणि लोणावळ्याहून दुपारी दोन आणि पावणेचार वाजता पुण्याला येणाऱ्या लोकलचा त्यात समावेश आहे. एक ऑक्टोबरपासून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यात सिग्नल यंत्रणा, रुळांची दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)