Tuesday, 13 November 2018

नाशिकफाट्यावर ट्रान्स्पोर्ट हब

पिंपरी- शहरातील मेट्रो मार्गातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ असून तेथील काम महामेट्रोने हाती घेतले आहे. येथील मेट्रोस्थानक तीन मजली होणार असून पहिल्या मजल्यावर व्यापारी संकुल असेल. लोकल रेल्वे, बीआरटी, मेट्रो आणि नाशिक रस्त्याकडे जाणारे प्रवासी यामुळे या चौकातील मेट्रोस्थानक हे शहरातील "ट्रान्स्पोर्ट हब' होणार आहे. 

गुन्हेगारांवर घरापासूनच "लक्ष'

पिंपरी -  पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. तसेच पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या घरोघरी जाऊन तपास सुरू केल्यामुळे पोलिसांचा वचकही वाढला आहे.

आयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी पुण्याच्या तुलनेत जादा वाहने देण्याची आवश्‍यकता होती. पुणे पोलिसांकडे ८६६ चारचाकी वाहने आहेत, तर पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाकरिता केवळ ४२ वाहने आहेत. यापैकी बहुतांश वाहने बंद पडत असल्याने अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

महापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’

पिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील भंगार साहित्य स्वीकारणे महापालिकेच्या भांडार विभागाने बंद केले असून, संबंधित विभागांच्या कार्यालयांमध्येही भंगार वाढू लागले आहे. 

बीआरटी मार्गावर १९० कर्मचारी

पिंपरी - अपघात रोखण्यासाठी व बीआरटी मार्गातून अन्य वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गावर पीएमपीएमएल प्रशासनाने तब्बल १९० कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्या वेतनासाठी दरमहा २८ लाख रुपये खर्च होत आहेत. 

Pimpri: पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे काम महिनाअखेरपर्यंत पुर्ण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगरंगोटीची कामे सुरु असून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत इमारतीचे काम पुर्ण होईल. त्यानंतर डिसेंबरच्या  पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे.  याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरासाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय […]

Pimpri: शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना राज्यसेवेत परत पाठविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा राज्य सेवेत पाठविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधा-यांनी उपसूचना घुसडून त्याबाबतचा ठराव केला आहे. सभावृत्तांत या ठरावाचा उल्लेख असला तरी महासभेत या उपसूचनेचे वाचनच झाले नाही. त्यामुळे या ठरावाचे नेमके ‘गौडबंगाल’ काय याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. तसेच शिक्षण […]