Friday 13 July 2012

प्राधिकरणाच्या आकुर्डी सुविधा केंद्रातील अग्निशमन यंत्रणा मनुष्यबळाअभावी 'पोरकी'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31298&To=9
प्राधिकरणाच्या आकुर्डी सुविधा केंद्रातील
अग्निशमन यंत्रणा मनुष्यबळाअभावी 'पोरकी'
पिंपरी, 3 जुलै
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने आकुर्डी येथे कोट्वधी रुपये खर्च करून अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असे मध्यवर्ती केंद्र उभारण्यात आले आहे. आग लागून आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास त्यावर लागलीच नियंत्रण मिळविण्याइतकी सक्षम यंत्रणा या केंद्रात आहे. मात्र, यंत्रणेची देखरेख करण्यासाठी प्राधिकरणाकडे स्वतंत्र विभाग नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलावरच प्राधिकरणाची भिस्त आहे. मंत्रालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे धिंडवडे निघाले. अग्निशमन दलातील अपु-या मनुष्यबळाची झळ खुद्द महापालिकेला बसत असल्याने प्राधिकरणाचे काय... असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अद्ययावत साधनसामुग्री असलेली आकुर्डी सुविधा केंद्रातील यंत्रणा मनुष्यबळाअभावी 'पोरकी' राहणार आहे.

No comments:

Post a Comment