Tuesday 21 May 2013

महिलांसाठी स्वतंत्र ...

महिलांसाठी स्वतंत्र ...:
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी प्राधिकरणातील दिशा फोरमच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन समितीच्या संचालिका भारती चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात भारती चव्हाण यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदन दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, महिलांचा सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. असंख्य महिला घराबाहेर पडून काम करीत असल्याचे आढळून येत आहे.
महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने त्या जास्त काळ बाहेर राहू शकत नाही, यामुळे त्यांच्या कार्यक्षमता व आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेमध्ये 50 टक्के महिला नगरसेविका आणि इतर अधिकारी असताना देखील शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची अंमलबजावणी होत नाहीत ही खेदाची बाब आहे.
महापालिकेच्या काही प्रभागांमध्ये स्वच्छतागृह आहेत. मात्र त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत. पाण्याचाही अभाव आहे. त्यामुळे महिला वर्गाची कुचंबणा होत असून महापालिकेने महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावीत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment