Saturday 1 June 2013

प्राधिकरणातील उद्याने फुलली

प्राधिकरणातील उद्याने फुलली: निगडी : मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने वातावरणात थोडासा बदल झाला असला, तरी दुपारच्या उकाड्यामुळे व उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्राधिकरणातील उद्याने नागरिक व बालगोपाळांनी फुलून जात आहेत.

प्राधिकरणातील संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानांमध्ये सूर्याची तांबूस किरणे बाहेर पडल्यापासूनच मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होत आहे. उद्याने सकाळी दहापर्यंत खुली असल्याने हिरवळीवर नागरिक गप्पागोष्टी करतात. सूर्य मावळतीला झुकायला लागला की, आबालवृद्ध उद्यानाकडे धाव घेतात. सायंकाळी सहाच्या दरम्यान उद्यानांमध्ये मोठी गर्दी होत आहे.

No comments:

Post a Comment