Monday 30 December 2013

घर वाचवायचे की नोकरी?

पिंपरी : दिलेल्या मुदतीत स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडले नाही, तर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा स्थापत्य विभागाने दिल्यानंतर घर वाचवायचे की नोकरी या विवंचनेतील महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे व्यथा मांडली. त्यांची भेट घेतल्यानंतर घरे वाचतील, निलंबनही होणार नाही, अशी समजूत करून घेतलेल्या त्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. ३१ डिसेंबर ही निलंबन कारवाईतून वाचण्याची शेवटची संधी आहे. अनधिकृत घर वाचविणे मात्र अशक्य आहे. 

No comments:

Post a Comment