Tuesday 28 January 2014

मानवी चुकांनी नद्या प्रदूषित

विश्‍वास मोरे - पिंपरी
उद्योगनगरीतून पवना, मुळा, इंद्रायणी या प्रमुख नद्या वाहतात. नागरी वसाहतींतील मैला सांडपाणी, तसेच येथील औद्योगिक वसाहतींतील पाणी प्रक्रिया न करताच थेट नदीत सोडले जात आहे. मानवी चुकांमुळे या नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. वाढत्या प्रदूषणाने जलचरांचेही आयुष्य धोक्यात आहे. तरीही हे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही प्रयत्न होत नाहीत. नद्यांबरोबरच शहरातील चारही नैसर्गिक तलाव प्रदूषित झाल्याचे पर्यावरण अहवाल सांगतो. त्यासाठी योजलेले उपाय अद्यापही कागदावरच आहेत. 

No comments:

Post a Comment