Friday 16 May 2014

प्रभागस्तरीय कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या बैठका

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिथिलता आलेल्या महापालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त राजीव जाधव हे 17 व 19 मे रोजी प्रभागस्तरीय बैठक घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा उद्या (शुक्रवारी) निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेली दीड महिने विकास कामांचा खोळंबा झाला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. विधानसभेची निवडणुकही तोंडावर आली आहे. त्यासाठीही दीड-दोन महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये खर्ची होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभागस्तरावरील तातडीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त जाधव हे लोकप्रतिनिधींच्या समवेत प्रभागस्तरीय बैठका घेणार आहेत. पावसाळा पूर्व कामांचा आढावाही त्यात घेण्यात येईल. दि. 17 मे रोजी 'अ', 'ब' आणि 'क' तर दि. 19 मे रोजी 'ड', 'इ', 'ई' या प्रभागांमध्ये बैठका होतील. तीन तासाची एक बैठक याप्रमाणे आयुक्त एका दिवशी तिन प्रभागांच्या सलग बैठका घेणार आहेत.

No comments:

Post a Comment