Wednesday 28 May 2014

आचारसंहितेमुळे स्थायी समितीचे 'अवलोकन'

लोकसभेची आचारसंहिता संपताच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेची विकास कामे खोळंबली असतानाच स्थायी समितीवरही अवलोकनाचे प्रस्ताव रेटून नेण्याची वेळ आली आहे. 
लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये गेला. निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिता संपताच महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीसाठी 20 मे पासून पुन्हा आचारसंहिता लागू झाली. महिनाभर ही आचारसंहिता कायम राहणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचेही बिगूल वाजणार आहे. त्यामुळे विकास कामे पुन्हा एकदा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार आहेत. 

No comments:

Post a Comment