Saturday 13 May 2017

पीएमपीएलकडून दैनंदीन पास योजना बंद

हद्दीच्या बाहेरील प्रवाशांच्या संख्येत तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी घट
  • उत्पन्नात घट झाल्याने प्रशासनाकडून निर्णय
पुणे – पीएमपीएल प्रशासनाची उत्पन्न गळती होवू लागल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांसाठी सवलतीचा दैनंदीन पास योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे माहापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना आता दैनंदिन पाससाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल असा प्रशासनाचा कयास होता. मात्र, प्रशासनाचा हा अंदाज साफ चुकला असून महापालिका हद्दीच्या बाहेरील प्रवाशांच्या संख्येत तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. परिणामी महसूलाचा टक्काही घटला आहे.

No comments:

Post a Comment