Saturday 1 July 2017

पीएमसीला कमी दराने डिझेल पुरवठ्यामागचे गौडबंगाल काय?

– स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचा तुकाराम मुंढेंना सवाल
पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपीएमएलने एचपीसीएल या इंधन पुरवठादार कंपनीकडून बाजारभावानुसार डिझेल खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. दुसरीकडे याच कंपनीने पुणे महापालिकेला प्रति लिटर डिझेलमागे बाजारभावापेक्षा ५० पैसे कमी दराने डिझेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे. पुणे महापालिकेला वार्षिक २ लाख ७० हजार लिटर डिझेल लागते, तर पीएमपीएमएलला वार्षिक १० लाख लिटर डिझेलची गरज भासते. असे असताना पीएमपीएमएलने एचपीसीएल कंपनीकडून बाजारभावानुसार डिझेल खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यामागचे गौडबंगाल काय आहे?, असा सवाल पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी उपस्थित केला आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment