Saturday 22 July 2017

माण-हिंजवडी रस्त्याची दैना

  • प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी
हिंजवडी, (वार्ताहर) – माण-हिंजवडी एमआयडीसीतील रस्त्याची अक्षरश: चाळण होवून रस्ता पाण्यात गेला आहे. जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यावर राडारोडा आल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
मुळशीकरांच्या नशिबी कायम सार्वजनिक बांधकाम विभागामुळे अवहेलना सहन करावी लागत आहे. तालुक्‍यात फिरताना कुठेही चांगले रस्ते आढळणे हे फारच दुर्मिळ आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिरंगाईमुळे 10 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर होवून उपलब्ध झालेला असला तरी माण-हिंजवडी रस्ता जो फेब्रुवारी 2017 पर्यंत होणे आवश्‍यक होता. तो न झाल्याने या रस्त्यामुळे मुळशीकरांची नक्कीच दैना झाली आहे.

No comments:

Post a Comment