Thursday 12 October 2017

“हॅण्डलिंग चार्जेस’ची बेकायदा आकारणी

वाहन चालकांची सर्रास लूट : विक्रेते-आरटीओची मिलीभगत?
तुषार रंधवे 
पिंपरी – तुम्ही कोणतेही दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी गेलात, तर तुमच्याकडून “हॅण्डलिंग चार्जेस’च्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त रक्कम उकळण्याचा प्रकार वाहन विक्रेत्यांकडून होत आहे. मात्र, आरटीओ अधिकाऱ्यांची “सेटींग’ असल्याने “तेरी भी चूप, मेरीभी चूप’ अशी स्थिती असून, यामध्ये विनाकारण सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत आहे. याबाबतच्या तक्रारी परिवहन आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर संबंधित वाहन विक्रेत्याचे व्यापार प्रमाणपत्र रद्द करण्याचे, तसेच वाहन उत्पादक कंपनीला ही बाब कळविण्याचे निर्देश आयुक्तालयाने दिले आहेत.

No comments:

Post a Comment