Sunday 14 January 2018

४२५ कोटीच्या कामात भाजपकडून १०० कोटीचा भ्रष्टाचार – शिवसेनेचा आरोप

पिंपरी (Pclive7.com)):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रस्ते विकासकामासाठी जागा ताब्यात नसतानाही आयुक्तांनी ४२५ कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे काढली. या कामांमध्ये ठेकेदारांनी संगनमत केल्याने सर्व कामे निविदा रकमेच्या चार ते दहा टक्के वाढीव दराने देण्यात आली आहेत. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या. या सर्व व्यवहारात करदात्यांच्या १०० कोटी रुपयांची लूट झाली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सहमतीनेच भाजप नेत्यांनी महापालिका तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप आज शिवसेनेने पुराव्यानिशी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंध विभाग आणि अमंलबजावणी संचानलय (ईडी) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही, शिवसेनेने पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment