Wednesday 30 May 2018

बँकांचा ३० आणि ३१ मे रोजी देशव्यापी संप

चौफेर न्यूज – उच्च वेतनासाठी देशभरातील बँकांनी बुधवार ३० आणि ३१ मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. आठवड्याच्या वारी बँका बंद असल्याने नागरिकांची बँकेची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. याबरोबरच बँका बंद असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. महिनाअखेर दरम्यान हा संप असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बँकांची महत्त्वाची कामे असल्यास ती आजच पूर्ण करावीत. इंडियन बँक असोसिएशन (आयबीए)ने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर काही बँक कर्मचारी निदर्शने करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

No comments:

Post a Comment