Sunday 5 August 2018

भूमी जिंदगी विभागाचे कामकाज सुधारण्याची गरज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तळ मजल्यावरील भूमी जिंदगी विभाग अंतर्गत काय कामे केली जातात हे निवडून आल्यानंतर आज देखील आम्हाला कळालेले नाही. महानगरपालिकेने कित्येक स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर आरक्षण टाकून विविध प्रयोजनासाठी जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्या बहुतांश जमिनीवर महापालिकेने इमारती, व्यापारी गाळे, सभागृह, जलतरण तलाव, हॉकर्स झोन, शाळा, वाचनालये, स्पर्धा परीक्षा केंद्र, नाट्यगृह, पाण्याच्या टाक्या आदी उभारण्यात आले आहेत. परंतु सद्यस्थितीला या विभागाच्या ताब्यात विकसन करण्यात आलेल्या किती जागा आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. शहरामध्ये असंख्य बेरोजगार आहेत. हे व्यापारी गाळे व सभागृह भाडे तत्वावर किंवा लीजने दिल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. तरी याविभागाचे कामकाज सुधारण्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित आदेश दिले जावेत. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेवक संदीप वाघिरे यांनी दिला आहे. याबाबत नगरसेवक वाघिरे यांनी निवेदनाद्वारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment