Thursday, 27 June 2013

सांगवी परिसरात घरफोड्याचे सत्र

सांगवी परिसरात घरफोड्याचे सत्र:
एकाच दिवसात चार सदनिकांवर चोरट्यांचा डल्ला
सांगवी परिसरात घरफोड्याचे सत्र जोरात सुरू असून मंगळवारी (दि. 25) एकाच दिवसात चार  ठिकाणी सदनिकेचे कुलूप उचकटून चोरटय़ांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. वाढत्या घरफोडीमुळे सांगवी पोलिसांची चांगलीच डोकेदुखी
Read more...

पिंपरीत वादग्रस्त प्रस्तावांमुळे लांबणीवर टाकलेली सभा आज

पिंपरीत वादग्रस्त प्रस्तावांमुळे लांबणीवर टाकलेली सभा आज: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त प्रस्तावांवर अभ्यास करण्याचे कारण देत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आठ दिवसांसाठी लांबणीवर टाकलेली सभा गुरुवारी (दि. २७) होणार आहे.

पोकलेनमुळे रहाटणीत अपघात

पोकलेनमुळे रहाटणीत अपघात: रहाटणी : विमल गार्डन ते तापकीर मळा येथील १२ मीटर रस्त्यावरची कारवाई थांबल्यानंतरही अनेक दिवसांपासून पालिकेचा हायराईज पोकलेन उभा होता. या पोकलेनला धडकून इंडिका (एमएच १४ बीए ४६८२) मोटारीचे नुकसान झाले. बेपर्वाईने उभा केलेला पोकलेन नुकसानीस कारणीभूत ठरल्याने मोटार मालकाने संताप व्यक्त केला.

‘झोपडपट्टय़ा न उठवता पुनर्वसन करा’

‘झोपडपट्टय़ा न उठवता पुनर्वसन करा’: पिंपरी : राज्य शासन आणि महापालिकेने शहरातील झोपडपट्टय़ा न उठवता आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) केली आहे.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयामागे असलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीधारकांना भोसरी एमआयडीसीने काही दिवसांपूर्वीच झोपडपट्टी उठविण्याविषयी नोटिसा दिल्या. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी ही भोसरी एमआयडीसीच्या जागेत गेली २0 ते २५ वर्षांपर्यंत वसलेली आहे.

‘त्या’ अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी

‘त्या’ अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी: पिंपरी : मुंबई उच्च न्यायालय स्थापित महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण कायदे संनियंत्रण समिती नियुक्त मानद पशु कल्याण अधिकारी संतोष कबाडी यांची गोवंश संरक्षण संदर्भातील तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या व त्यामुळे त्यांच्यावर कसायांकडून झालेल्या जीवघेण्या हल्लय़ास जबाबदार असणार्‍या भोसरी पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मातृभूमी दक्षता चळवळीने पोलीस उपायुक्त (परिमंडल ३) शहाजी उमाप यांच्याकडे केली आहे.

कबाडी यांनी २२ जूनला पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या शेती व दुग्धोपयोगी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो (एमएच १४ बीजे १८४७) अडवून ेचालक व मालकाविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी टेम्पो (२३ जनावरांसह) भोसरी पोलीस ठाण्यात नेला. पण भोसरी पोलिसांनी हद्दीचा वाद घालून कबाडी यांना स्पाईन रोड पोलीस ठाणे (एमआयडीसी) भोसरी येथे तक्रार दाखल करण्यास सांगितले.

भोसरीतील भाजी मंडईची दुरवस्था

भोसरीतील भाजी मंडईची दुरवस्था: भोसरी : येथील संत ज्ञानेश्‍वर भाजी मंडईची अवस्था बिकट झाली असून, पावसामुळे या अवस्थेत अधिकच भर पडली आहे. मंडईतील बहुतेक शेड गळकी असून पावसामुळे मंडईत ठिकठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. येथील स्वच्छतागृहाची दयनीय झाली आहे.

नागरिकांना भाजी खरेदीसाठी नाकाला रुमाला लावावा लागत असून, त्यांच्यापेक्षाही अधिक हाल विक्रेत्यांचे होत आहे. त्यामुळे या भाजी मंडईची दुरवस्था तातडीने दूर करावी, अशी मागणी भाजी विक्रे ते आणि नागरिकांमधून होत आहे.

नौकरानी से दुष्कर्म के आरोप में सॉफ्टवेयर इंजीनियर गिरफ्तार

नौकरानी से दुष्कर्म के आरोप में सॉफ्टवेयर इंजीनियर गिरफ्तार - दैनिक जागरण:

दैनिक जागरण

नौकरानी से दुष्कर्म के आरोप में सॉफ्टवेयर इंजीनियर गिरफ्तार
दैनिक जागरण
सांगवी थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने बताया कि नौकरानी से 26 अप्रैल को कथिततौर पर दुष्कर्म किया गया था। प्रशांत की पत्नी और बेटा अपने पैतृक निवासी गए हुए थे। नौकरानी काम करने के लिए प्रशांत के घर पर आई थी। प्रशांत ने चाकू का भय दिखाकर ...