Thursday 27 June 2013

‘त्या’ अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी

‘त्या’ अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी: पिंपरी : मुंबई उच्च न्यायालय स्थापित महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण कायदे संनियंत्रण समिती नियुक्त मानद पशु कल्याण अधिकारी संतोष कबाडी यांची गोवंश संरक्षण संदर्भातील तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या व त्यामुळे त्यांच्यावर कसायांकडून झालेल्या जीवघेण्या हल्लय़ास जबाबदार असणार्‍या भोसरी पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मातृभूमी दक्षता चळवळीने पोलीस उपायुक्त (परिमंडल ३) शहाजी उमाप यांच्याकडे केली आहे.

कबाडी यांनी २२ जूनला पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या शेती व दुग्धोपयोगी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो (एमएच १४ बीजे १८४७) अडवून ेचालक व मालकाविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी टेम्पो (२३ जनावरांसह) भोसरी पोलीस ठाण्यात नेला. पण भोसरी पोलिसांनी हद्दीचा वाद घालून कबाडी यांना स्पाईन रोड पोलीस ठाणे (एमआयडीसी) भोसरी येथे तक्रार दाखल करण्यास सांगितले.

No comments:

Post a Comment