Wednesday, 24 October 2018

झोपडपट्टीमुक्तीसाठी थांबा १४२ वर्षे

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन होऊन बारा वर्षे पूर्ण झाली. परंतु आतापर्यंत केवळ ४७ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले. शहरातील घोषित झोपडपट्ट्यांची संख्या ५५७ आहे. सरकारचे धोरण असेच राहिले, तर पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी सुमारे १४२ वर्षे लागतील. 

विकासकामांसाठी शासकीय जागा आगाऊ मिळणार

पुणे - शासकीय काम आणि सहा महिने थांब, हा सर्वसामान्य नागरिकांना येणारा अनुभव सरकारमधील खात्यांना देखील येत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, आता त्याला फाटा देत राज्य सरकारने सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी सरकारी जागेची मागणी झाली, तर त्यांना आगाऊ जमिनीचा ताबा द्यावा, असे आदेश काढले आहेत. ताबा दिल्यानंतर उर्वरीत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे विकासकामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

तब्बल 38 टक्के पाण्याची गळती अन् चोरी

चौफेर न्यूज : शहरात दररोज होत असलेल्या पाणी पुरवठ्यापैकी तब्बल 38 टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचा खुलासा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केला आहे. 31 ऑक्टोंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून या विभागाच्या सर्वच अधिकार्‍यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याचे सांगत आयुक्तांनी एकप्रकारे अघोषित ‘पाणीबाणी’ जाहीर केली आहे.

मॉडर्नमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळा

निगडी – यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. प्राचार्य सतीश गवळी यांनी कार्यशाळेचे उद्‌घाटन केले.शिरीष पडवळ यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील बनवण्यास शिकवले. चौकोनी, गोलाकार, चांदणी अशा विविध आकाराचे आकाश कंदील बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. दिवाळीसाठी बाजारात प्लास्टिकचे अनेक आकाश कंदील विक्रीसाठी येतात. मात्र प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पूरक आकाश कंदीलच सर्वांनी वापरावेत, यासाठी जनजागृती करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला. 

राजमाता जिजाऊ महाविद्यालयात नव मतदार नोंदणी सुरू

भोसरी – भोसरी विधानसभा मतदार संघ आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नव मतदार नाव नोंदणी सुरू केली आहे. तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उप प्राचार्य प्रा. दादासाहेब पवार यांनी उद्‌घाटन केले. वय वर्षे 18 पूर्ण आहे त्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक पावडे, प्रा. सविता वीर, प्रा. मिनाक्षी मांढरे, प्रा. सुनिता पंचारिया, प्रा. कमलेश जगताप यांनी नियोजन केले.

अतिरिक्‍तांना आयुक्‍तांचे पाठबळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पाठिशी घालत आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील हर्डीकर यांची ही भूमिका संशयास्पद आहे, अशा आरोप नगरसेवक राजू मिसाळ यांनी केला आहे.

हजारो लिटर पाणी वाया

सांगवी – स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. मात्र, या कामात होत असलेल्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे कमी पाऊस पडला आहे, तसेच भविष्यात पाणी टंचाईची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. असे असताना दुसरीकडे मात्र पालिकेकडून करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळ खोदकाम करत असताना जेसीबीमुळे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.