Wednesday 24 October 2018

मॉडर्नमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळा

निगडी – यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. प्राचार्य सतीश गवळी यांनी कार्यशाळेचे उद्‌घाटन केले.शिरीष पडवळ यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील बनवण्यास शिकवले. चौकोनी, गोलाकार, चांदणी अशा विविध आकाराचे आकाश कंदील बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. दिवाळीसाठी बाजारात प्लास्टिकचे अनेक आकाश कंदील विक्रीसाठी येतात. मात्र प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पूरक आकाश कंदीलच सर्वांनी वापरावेत, यासाठी जनजागृती करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला. 

No comments:

Post a Comment