वॉर्डसभेची अंमलबजावणी करा-पुणे प. महाराष्ट्र-महाराष्ट्र-Maharashtra Times प्रभागनिहाय क्षेत्रीय (वार्ड) सभेची स्थापना करून त्याचे कामकाज चालू करावे, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल ३१ जुलैपर्यंत प्रशासनाला सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे.
केंद सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुननिर्र्माण अभियानांतर्गत केंद, राज्य आणि महापालिका यांच्यात (जेएनएनयूआरएम) २००६ मध्ये द्विपक्षीय करारनामा झाला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या सुधारणांची अंमलबजावणी व्हावी, असे सूचित केले आहे. त्याअंतर्गत पाच जून २०१२ रोजी झालेल्या बैठकीत क्षेत्रीय सभा स्थापन करण्याबाबत आणि त्यांच्या कामकाजाविषयी आदेश दिले आहेत. त्याविषयी महापालिकेच्या अ, ब, क आणि ड प्रभाग अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 21 August 2012
मी मरणोत्तर देहदान करणार
मी मरणोत्तर देहदान करणार: भोसरी -इच्छा असूनही वडिलांना मरणोत्तर देहदान करता आले नाही. मात्र मी स्वतः देहदान करून वडिलांची इच्छा पूर्ण करणार आहे, असा मनोदय जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी व्यक्त केला.
बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे उद्योजकांना आर्थिक फटका
बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे उद्योजकांना आर्थिक फटका: पिंपरी -  सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे आणि सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे उद्योग-व्यावसायिकांना एक हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
'महापारेषण'च्या 'एनओसी'शिवाय बांधकामे
'महापारेषण'च्या 'एनओसी'शिवाय बांधकामे: पिंपरी -  उच्च दाब वीज वाहिनी गेलेल्या शहरातील बहुतांश भागात बांधकामे करताना नागरिकांनी "महापारेषण'चे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतलेले नसल्याचे उघडकीस आले आहे.
कदम कदम बढाके समाजपरिवर्तनाचे धडे
कदम कदम बढाके समाजपरिवर्तनाचे धडे: पिंपरी - 'स्त्रीभ्रूणहत्या... व्यसनाधीनता... निरक्षरता... हुंड्यासाठी होणारा छळ... 'आजही समाजात ... आधुनिकतेच्या युगात या समस्या कायम आहेत. किंबहुना तीव्र स्वरूप धारण करू लागल्या आहेत; मात्र सामान्य नागरिक या अनिष्ट रूढींना विरोध न करता सहज स्वीकारत आहेत. मात्र, अशा अंधारात समाजाला उजेडाकडे घेऊन जाणारी एखादी व्यक्ती असतेच. समाजपरिवर्तनाचे कार्य रहाटणीतील विद्या कदम (गृहिणी) "लेकुरे उदंड झाली...' या एकपात्री सादरीकरणाद्वारा करताहेत.
कारवाईला अडथळा, नगरसेवकांनो सांभाळा
कारवाईला अडथळा, नगरसेवकांनो सांभाळा: अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करणा-या नगरसेवकांचे पद रद्द ठरविण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी रविवारी दिला.
घरपोच परवाना योजनेचा बोजवारा
घरपोच परवाना योजनेचा बोजवारा: पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाची अवस्था सरकारी काम आणि एक महिने थांब अशी झाली आहे. वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना महिना-महिना हेलपाटे मारावे लागत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)