Tuesday, 27 November 2012

सर्वसाधारण सभेवरील नियंत्रण सुटल्याने महापौर हतबल

सर्वसाधारण सभेवरील नियंत्रण सुटल्याने महापौर हतबल:
तब्बल १८० कोटींचा आर्थिक फटका देणाऱ्या जकात समानीकरणाच्या बहुचर्चित प्रस्तावावरून सोमवारी पिंपरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची छुपी दुकानदारी असल्याची चर्चा असलेल्या या प्रस्तावावर बोलू न दिल्याने संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुभवी नगरसेवकांनी या गोंधळातच विषयपत्रिकेवरील २८ प्रस्ताव काही मिनिटांत मार्गी लावले. या गोंधळात महापौरांचे सभेवरील नियंत्रण सुटल्याचे दिसून आले.
पिंपरी पालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने जकात विभागाच्या १८ वस्तूंचे दर समान ठेवण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावामुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याची बाब काही सदस्यांनी महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच जकातीचे दर वाढवण्यास सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोधही दर्शविली. चर्चेचा समारोप करताना राष्ट्रवादीकडून योगेश बहल यांनी मांडलेली उपसूचना व समानीकरणाचा प्रस्ताव महापौरांनी मंजूर केला. तथापि, उपसूचनेवर आम्हाला बोलायचे आहे, असे सांगत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र, मंजूर झालेल्या विषयावर बोलता येणार नाही, असे सांगत महापौरांनी पुढील विषय वाचण्याचे आदेश दिले. त्यामुळे सेनेचे नगरसेवक संतापले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. बाबासाहेब धुमाळ, श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे, सीमा सावळे यांच्यासह सेनेचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांनी महापौर व राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहात कमालीचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महापौर शिवसेना नगरसेवकांना बोलू देत नव्हत्या. तर, बोलू न दिल्यास सभा बंद पाडू, असा पवित्रा सेना नगरसेवकांनी घेतला. गोंधळामुळे महापौरांना काही सुचत नव्हते. क्षणात एक आदेश देऊन दुसऱ्या क्षणी त्या भलतेच सांगत होत्या. दुसरीकडून मंगला कदम, शमीम पठाण, नारायण बहिरवाडे, जितेंद्र ननावरे आदींनी विषय घाईने वाचण्याचा सपाटा लावला होता. हे विषय मंजूर झाल्याचे महापौरांनी घोषित करणे अपेक्षित होते.
शिवसेना नगरसेवकांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सरसावल्याने गोंधळात भर पडली. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात २८ विषयांचे कामकाज संपवण्यात आले. त्यात अनेक महत्त्वाचे विषय होते. मात्र, त्यापैकी मंजूर कोणते, तहकूब कोणते, कोणत्या विषयावर कुठली उपसूचना दिली, याचा कुणालाही मेळ नव्हता. अखेर, गोंधळातच सभेचे कामकाज संपल्याचे महापौरांनी जाहीर केले. सभेनंतरही सेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या धिक्काराच्या घोषणा सुरूच ठेवल्या होत्या.  

PCMC okays octroi rationalisation

PCMC okays octroi rationalisation: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) approved a resolution to rationalise octroi rates in the township at its general body meeting held on Monday.

Now, an SMS prompt to pay your power bill

Now, an SMS prompt to pay your power bill: The Pune zone of the Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) will soon start sending SMSs to consumers' mobile phones, informing them about their electricity bills.

ऑनलाइन वीजबिलिंगमध्ये पुणेकर आघाडीवर

ऑनलाइन वीजबिलिंगमध्ये पुणेकर आघाडीवर: वीजबिले भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास आणि विलंब झाल्यास होणारा दंड टाळण्यासाठी ऑनलाइन वीजबिले भरणा-या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिन्यात ऑनलाइन वीजबिले भरणा-या पुणेकरांची संख्या सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे.

अजितदादा ‘डागडुजी’ साठी शुक्रवारी पिंपरीच्या बालेकिल्ल्यात

अजितदादा ‘डागडुजी’ साठी शुक्रवारी पिंपरीच्या बालेकिल्ल्यात:
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात कुठेही न मिळालेले निर्विवाद बहुमत देणाऱ्या िपपरी पालिकेतील नगरसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी चिंचवडला येत असून त्यांच्या उपस्थितीत अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणातून बऱ्यापैकी बाजूला पडलेल्या अजितदादांनी बालेकिल्ल्यातील डागडुजीसाठी आवर्जून वेळ काढला आहे.
िपपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून अजितदादा तेथे कारभारी आहेत. मागील काळात अजितदादांचा शहराशी संपर्क कमी झाला आहे. सध्या ते काही काळापुरते राज्याच्या राजकारणातून बाजूला पडले आहे. अशात, त्यांनी बालेकिल्ल्यातील नेते व नगरसेवकांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळ काढला आहे. गेल्या काही वर्षांपासून अजितदादांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी सोडवल्याची राष्ट्रवादीची जुनी पध्दत आहे. तथापि, नव्या नगरसेवकांची तशी बैठक झाली नव्हती. स्थानिक नेते नगरसेवकांना अजितदादांपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे अनेक नगरसेवक त्यांची भेट घेण्यासाठी व स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी आतूर आहेत. या पाश्र्वभूमीवर, अजितदादांच्या उपस्थितीत चिंचवडला बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी ते पक्षाचे नेते व नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, महापालिकेच्या विविध प्रकल्प, योजना व निर्णयांचा आढावा घेणार आहेत.  

शहिदांची नावे रस्त्यांना देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी?

शहिदांची नावे रस्त्यांना देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी?:
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना शहीद पोलीस अधिकाऱ्यांची नावे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नसल्याची बाब राजीव गांधी प्रतिष्ठानने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यापुढील काळात पालिकेतील महत्त्वाच्या प्रकल्पांना अथवा मोठय़ा रस्त्यांना त्यांची नावे देऊन त्यांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवावी, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी आयुक्तांना हे निवेदन दिले आहे. मुंबईत २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन यांची नावे पालिकेच्या प्रकल्पांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याचे काय झाले, असा मुद्दा प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. त्याची अंमलबजावणीसाठी प्रतिष्ठानकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. महापालिका सभागृहात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणीही संस्थेने आयुक्तांकडे केली आहे.

भाडेकरू नोंदीबाबत पोलिसांचा ढिसाळपणा

भाडेकरू नोंदीबाबत पोलिसांचा ढिसाळपणा: पुणे। दि. २६ (प्रतिनिधी)

घातपात करणारे अतिरेकी एखादी खोली किंवा फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असल्याचे पुण्यात वारंवार दिसून आल्यानंतरही पोलीस त्याबाबत अद्यापही ढिलाई दाखवीत आहेत. ग्रामीण पोलिसांकडे भाडेकरूंच्या संख्येची एकत्रित नोंदच नसल्याचे आणि पोलीस ठाण्यांकडूनही घरमालकांना भाडेकरूंची नोंदणी करण्याबाबत सूचना नसल्याचे आढळून आले.

पुणे शहर पोलिस आयुक्तांनी घरमालकांना सावध करून भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले होते, त्याला शहरात चांगला प्रतिसादही मिळाला. ज्यांनी अशा नोंदी केल्या नव्हत्या, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यास भाडेकरू त्या माहितीचा न्यायालयीन पुरावा म्हणून वापर करण्याची शक्यता असल्याने सर्वच जुन्या भाडेकरूंची नोंद झालेली नाही. तथापि, नव्याने राहण्यासाठी आलेल्या भाडेकरूंची नोंद ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हद्द पालिकेची आणि अंमल ग्रामीण पोलिसांचा असे चित्र काही उपनगरांमध्ये आहे.

घातपात करणार्‍यांना पुणे शहरात चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असला तरी ग्रामीण भागात मात्र रान मोकळे आहे.

जंगली महाराज रस्त्यावर साखळी बाँबस्फोट करणार्‍यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील घरात आश्रय घेतला असल्याचे दिसून आले आहे.

भाडेकरूची पूर्ण माहिती, छायाचित्र, मोबाईलनंबर यांची माहिती घरमालकांनी भरून द्यावी यासाठी पुणे शहर पोलिसांनी पोलीस ठाण्यांच्या बाहेर स्वतंत्र टपालपेटी ठेवल्याचे दिसून येते. पुणे ग्रामीण पोलीस दलातच याबाबत ढिसाळपणा आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात सोसायट्या आणि घरे आहेत. शहर पोलिसांची हद्द राजाराम पुलापर्यंतच असून त्यापुढे हवेली पोलीस ठाण्याची हद्द सुरू होते. या ठिकाणी हिंगणो, आनंदनगर, वडगाव, धायरी, नांदेड, किरकटवाडी अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात सोसायट्या आहेत.त्यामध्ये मोठय़ा संख्येने भाडेकरूही राहतात.