Wednesday, 24 October 2018

एका रात्रीत तयार केलेला ‘तो’ गतिरोधक ठरतोय धोकादायक !

वाकड – डांगे चौक, चिंचवड रस्त्यावरील थेरगाव पुलाजवळ अचानक एका रात्रीत तयार केलेला ‘तो’ गतिरोधक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. चोवीस तासाच्या आतच सहा जण धडकून पडले आहेत. या सहा अपघातांपैकी एका अपघातात जखमी झालेल्या व्यक्‍तीची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. कोणतेही निकष, मानक न पाळता रातो-रात तयार करण्यात आलेला हा गतिरोधक वेग कमी करण्याऐवजी अपघातांचे कारण बनला आहे. हा धोकादायक गतिरोधक ताबडतोब काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पिंपरी महापालिकेकडून 36 टक्के पाण्याचा जादा वापर

कामशेत –पिंपरी-चिंचवड महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या मान्यतेपेक्षा 36 टक्के अधिक पाण्याचा वापर केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाणीसाठ्यात 8 टक्के घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळा, असे लेखी पत्र खडकवासला पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाठविले आहे.

Tuesday, 23 October 2018

कोजागिरी पोर्णिमेसाठी महापालिकेची उद्याने रात्री १ वाजेपर्यंत खुली राहणार*

कोजागिरी पोर्णिमेचा नागरिकांना आनंद घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची उद्याने आज रात्री १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
शहरातील नागरिकांना कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्यासाठी दरवर्षी महापालिकेची उद्याने रात्री उशिरापर्यंत खुली ठेवली जातात. महापालिकेची शहरात १०५ उद्याने आहेत. नागरिकांना आज कोजागिरी पोर्णिमेचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेची उद्याने रात्री १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली आहे.

पिंपरीत ‘स्मार्ट सिटी’ वेगात

पिंपरी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, कासारवाडी व वाकड भागांत काही कामे सुरू आहेत. त्यातील एरिया बेस डेव्हलपमेंटविषयक कामे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत रस्ते, नालेसुधार, क्रीडांगणे, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्थानक परिसर व बीआरटी स्टेशन आदींबाबतची पायाभूत कामे केली जाणार आहेत. 

पाच बसथांबे मेट्रोमुळे धूळखात

जुन्या पुणे-मुंबई मार्गावर मेट्रोच्या कामामुळे लाखो रुपयांचे बीआरटीचे बसस्थानक वापराअभावी पडून आहेत. त्यामुळे बीआरटीच्या वापरापूर्वीच त्याची वाट लागली आहे. या मार्गावरील पाच बसथांबे बंद स्थितीत आहेत. मेट्रोच्या कामामुळे पुढील अनेक महिने ते बंद असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होणार नसल्याने त्यावर पुन्हा खर्च करण्याची नामुश्की येणार आहे.

‘बीआरटी’ मार्गावर ‘सीसीटीव्ही’चा वॉच

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील ‘बीआरटी’ मार्गावार खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ची मदत घेणार असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दापोडी ते निगडी मार्गावरील पहिल्या टप्प्यात बस स्थानकावर कॅमेरे बसवण्यात येणार असून, ते काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीन देण्यात आली. 

पाण्याचे स्त्रोत वाढवा, पुनर्वापरावर भर द्या !

वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. परिणामी, पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे शहराला 500 एमएलडी पाणी अपुरे पडत असून, त्यावर उपाय करण्यासाठी नगरसेवकांनी अनेक सूचना व सल्ले प्रशासनाला दिले आहेत. पाण्याचे नवे स्त्रोत वाढवण्याबरोबरच पाण्याच्या पुनर्वापरावर भर देऊन रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.