Tuesday 10 July 2012

धान्य, केरोसीनचा २३ लाखांचा अपहार

धान्य, केरोसीनचा २३ लाखांचा अपहार: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

धान्य व केरोसीनचा सुमारे २३ लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा तानाजीनगर चिंचवड येथील दुकानदारावर दाखल झाला आहे. याप्रकरणी एम. बी. सोनवणे (रा. तानाजीनगर, चिंचवड) यांना गुरुवारी सायंकाळी अटक झालेली आहे.

याप्रकरणी शासकीय अधिकारी चंद्रशेखर मानसिंग जाधव (वय ४६, रा. एफ, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. चिंचवड येथील डोके यांच्या घरासमोर तानाजीनगरात सोनवणे यांचे रास्त भाव धान्य दुकान (धान्य परवाना क्र. ए ५७, केरोसीन परवाना केईआरए १७) आहे. शासनाच्या नियमानुसार या दुकानातून शिधापत्रिकाधारकांना कमी किमतीत धान्य व केरोसीन दिले जाते. जिल्हा अन्नपुरवठा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात शिधापत्रिका तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. या अंतर्गत संबंधित अधिकार्‍यांनी शहरात शिधापत्रिका शोध मोहीम राबविली. शहरातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी सध्या सुरू आहे.

सोनवणे यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. जाधव यांच्या पथकाने २00७ ते डिसेंबर २0११ या कालावधीतील अन्न-धान्य वितरणाचे रेकॉर्ड तपासण्यात आले. छाननी करण्यात आली. त्यात धान्य व केरोसीनचा २२ लाख ७८ हजार ६३७ रुपयांचा गैरव्यवहार आढळला. त्यानुसार शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार जाधव यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा क्रमांक तीन व सातमधील तरतुदीनुसार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सोनवणे यांना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment