Saturday 21 July 2012

तळवडय़ातील ‘हरिण उद्यान’ कागदावरच!

तळवडय़ातील ‘हरिण उद्यान’ कागदावरच!:
बाळासाहेब जवळकर
पुणे व पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि नागरिकांसाठी करमणुकीचे मुख्य केंद्र तयार करण्यासाठी म्हणून पिंपरी महापालिकेने १४ वर्षांपूर्वी तळवडे येथे डीयर पार्क अर्थात हरणांचे उद्यान उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांमधील इच्छाशक्तीचा अभाव, शासकीय संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव व केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असल्यामुळे राज्यातील पहिला प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेले हे बहुचर्चित उद्यान कागदावरच राहिले आहे. एकतर हा प्रकल्प पूर्ण करावा अथवा तो रद्द केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Read more...

No comments:

Post a Comment