Tuesday 3 July 2012

महापालिका सभेत आज खडाजंगी?

महापालिका सभेत आज खडाजंगी?: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)

नगरसेवक श्रीरंग बारणे, वर्षा मडिगेरी, चंद्रकांता सोनकांबळे यांनी महापालिका सभेच्या अनुषंगाने विचारलेल्या नदीपात्रातील बांधकामे, राडारोडा, नदीपात्रात मिसळणारे नाले, मैलाशुद्धिकरणावर होणारा खर्च प्रश्नांची उतरे प्रशासनाने दिली आहेत. या लेखी उत्तरात नदीपात्रात अतिक्रमणे होत असताना, महापालिका ती रोखू शकली नाही. तसेच जलप्रदूषणावरही नियंत्रण आणता आले नसल्याचे स्पष्ट होते. या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने महापालिका सभेत आज खडाजंगी होणार आहे.

नदीपात्रात मैलासांडपाणी जाते, याची कबुली अधिकार्‍यांनी दिली आहे. मैलासांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? या उत्तरात मात्र मैलाशुद्धिकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता घेतली असल्याचे नमूद केले आहे. पवनानदी पात्रात जमा होणारा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी आदी ठिकाणी राडारोडा टाकून नदीपात्रात भराव टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे. भराव टाकणार्‍या नागरिकांवर उपद्रव शोध पथकामार्फत झालेल्या कारवाई व्यतिरिक्त मोठी कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. नदीपात्रातील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही, तसेच नदीपात्रातील कचर्‍याची मोजदादसुद्धा नाही, असेही महापालिका अधिकार्‍यांनी कबूल केले आहे. मैलाशुद्धिकरण केंद्रावर महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत १४३ कोटी खर्च झाला आहे. २00८ ते २0१२ या कालावधीत प्रत्येक वर्षी १२ कोटींच्यापुढे हा खर्च गेला आहे. एवढा खर्च होऊनही नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी रोखण्यात यश आले नाही.

No comments:

Post a Comment