Wednesday 1 August 2012

प्रशासनाचे विकासकामांकडे दुर्लक्ष

प्रशासनाचे विकासकामांकडे दुर्लक्ष: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामांच्या पाडापाडीकडे अधिक लक्ष वेधल्याने विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली.

काळेवाडी ते एम्पायर इस्टेट या उड्डाणपुलाचे काम गॅमेन इंडिया या ठेकेदारास दिले आहे. अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. अनेकदा नोटीस देऊनही सुधारणा घडून आलेली नाही. जलपर्णी काढण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले आहे, त्याचे बिल अदा करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. काळेवाडी शिवरत्न सोसायटीजवळच्या रस्त्याचे काम केले जात नाही. अधिकारी वेगवेगळ्या सबबी पुढे करतात, अशी तक्रार ड प्रभाग अध्यक्षा नीता पाडाळे यांनी केली. देहू -आळंदी रस्त्याच्या कामाचे केवळ भूमिपूजन झाले. काम अद्यापही सुरू नाही. विद्युत विभागाकडे केवळ चार हायड्रोलिक वाहने आहेत. तसेच कर्मचारी संख्याही अपुरी आहे. त्यामुळे चर्‍होली, मोशी या भागातील विद्युत दुरुस्तीची कामे होत नाहीत, असे विनया तापकीर म्हणाल्या.

No comments:

Post a Comment