Monday 13 August 2012

वाहतूक विभागाची मनमानी थांबणार केव्हा?

वाहतूक विभागाची मनमानी थांबणार केव्हा?: प्रवीण बिडवे। दि. १0 (पिंपरी)

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने छडी उगारावी, तसे एकेरी मार्गावरून येणार्‍या वाहनचालकांस अपराध्या सारखी वागणूक देत दंड आकारायचा. अवघ्या तास-दोन तासांत पावती पुस्तक रिते करून ‘टार्गेट’ पूर्ण करायचे. बरे, कारवाईची ना ठराविक वेळ ना ठरलेला दिवस. वाहतूक विभागाकडून वाटेल तेव्हा कारवाईचा बडगा उगारून नागरिकांच्या खिशात हात घातला जात आहे. इतरवेळी पिंपरीतील विशाल इस्क्वेअर समोरील रस्त्यावरून बिनदिक्कतपणे ये-जा करणारे बापुडे वाहनचालक अचानक होऊ लागलेल्या कारवाईमुळे धास्तावले आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा कुणाच्या हितासाठी कारवाईचा दंडुका उगारून चालकांना जेरीस आणण्याचे कर्तव्य पार पाडले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

No comments:

Post a Comment