Tuesday 28 August 2012

उल्हासनगरमधील बेकायदेशीर बांधकामे नियमित होतात तर उद्योगनगरीतील का नाही ? - तावडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32728&To=10
उल्हासनगरमधील बेकायदेशीर बांधकामे नियमित होतात तर उद्योगनगरीतील का नाही ? - तावडे
पिंपरी, 26 ऑगस्ट
सामान्य नागरिकांनी घामाच्या पैशातून उभारलेले 'स्वप्नातील घर' राष्ट्रवादी काँग्रेसने जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यापेक्षा उल्हासनगरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी पिंपरी येथे केली. राष्ट्रवादीच्या राज्यात मोगलाई बोकाळली असून, प्रशासनाला हाताशी धरून नागरिकांचा 'निवारा' हिरावून नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. इथले एकही घर पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

No comments:

Post a Comment