Thursday 4 October 2012

‘कॉल रेकॉर्डिंग’ने माननीयांचा ‘व्हॉल्यूम’ डाऊन

‘कॉल रेकॉर्डिंग’ने माननीयांचा ‘व्हॉल्यूम’ डाऊन: पुणे। दि. १ (प्रतिनिधी)

अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान अधिकार्‍यांना धमकावून कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार्‍या माननीयांचा ‘व्हॉल्यूम’आता डाऊन झाला आहे. कारवाईत अडथळा येऊ नये यासाठी थेट रेकॉर्डिंग करण्याचे सॉफ्टवेअरच अधिकार्‍यांच्या मोबाईलमध्ये बसविण्यात आले आहे.

प्रभागातील कामे करून घेण्यासाठी अथवा आपल्या परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवरील कारवाई रोखण्यासाठी माननीयांची अधिकार्‍यांना केली जाणारी दमबाजी तशी नवीन नाही. ते माझे मतदार आहेत.. कारवाई थांबवा, काम सुरू करण्याआधी मला विचारणा केली का? अशा शब्दांत अधिकार्‍यांवर दादागिरी करतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असताना हस्तक्षेप नको म्हणून बांधकाम तसेच अतिक्रमण विभागाच्या काही अधिकार्‍यांच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सोय असलेले खास सॉफ्टवेअर लोड करण्यात आले आहे. त्यामुळे अशा कारवाईवेळी आलेल्या सर्व प्रकारच्या मोबाईल कॉल्सचे रेकॉर्डिंग होत आहे. अशा वेळी माननीय ऐकण्याच्या स्थितीत नसतील तर त्यांना थेट ‘साहेब तुमचा कॉल रेकॉर्ड होत

आहे. तुमची मागणी पूर्ण करायची असेल तर तुमचा हा संवाद कागदावर उतरावावा लागेल’ धमकीच आता अधिकारीही देत आहेत. असाच काहीसा अनुभव एका माननीयास आल्यानंतर त्याने अधिकार्‍यांना फोन करणेच बंद केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. कारवाईस जाण्यापूर्वी जवळच्या माननीयांना माहिती पुरविणार्‍या अधिकार्‍यांवरही या यंत्रणेने नियंत्रण येणार असल्याचे या अधिका-याने सांगितले.

No comments:

Post a Comment