Tuesday 23 October 2012

रावण दहनाच्या पूर्व तयारीला वेग

रावण दहनाच्या पूर्व तयारीला वेग
पिंपरी, 22 ऑक्टोबर
दस-याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा भारतातील अनेक शहरातून रूढ आहे. दस-याच्या दिवशी श्रीरामाने रावणाला मारून सीतेची सुटका केली अशी कथा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी रावण दहन केले जाते. बांबूच्या तट्ट्याच्या सहाय्याने रावणाचा भव्य पुतळा तयार केला जातो. त्यामध्ये फटाके भरले जातात. दस-याच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या मुलाला रामाची वेशभूषा करून त्याने सोडलेल्या आगीच्या बाणाने रावणाचे दहन केले जाते. अशा प्रकारचे पुतळे करण्याच्या तयारीला वेग आला असून त्यासाठी लागणारे पुतळे, मुखवटे तयार होत आलेले आहेत.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment