Wednesday 5 December 2012

बँक खात्यावर रॉकेल मिळणार

बँक खात्यावर रॉकेल मिळणार: पुणे। दि. ४ (प्रतिनिधी)

शासनाच्या वतीने रॉकेलसाठी देण्यात येणारे अनुदान आता थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असून, त्यासाठी दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर देखील जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांने हे बँकखाते उघडले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता बँक खाते क्रमांक दिल्यानंतरच रॉकेल देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या वतीने रॉकेलसाठीचे अनुदान आता पर्यंत संबंधित तेल कंपन्यांना देण्यात येत होते. परंतु आता रॉकेल वितरण बंद करून पात्र लाभार्थ्यांना दये रॉकेलवर सबसीडी (अनुदान) रोखीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. बँक खाते उघडण्यासाठी शासनाने दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली. बँक खाते उघडल्यानंतर खाते क्रमांक व पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची एक झेरॉक्स प्रत गावकामगार तलाठी यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले आहे. परंतु अद्यापही अनेक लाभार्थ्यांनी बँक खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

घरातील पुरुषाच्या नावे बँक खाते असल्यास त्यामध्ये केवळ महिलेच्या नावाचा समाविष्ट करुन संयुक्त खाते सुरु करावे किंवा महिलेच्या नावे स्वतंत्र खाते सुरु करायचे आहे. त्यामुळे अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी बँक खाते सुरु केले नाही त्यांनी त्वरीत खाते सुरू करावे, असे अवाहन देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment