Sunday 16 December 2012

'रेडझोन'मुळे प्राधिकरणातील बांधकामे ठप्प

'रेडझोन'मुळे प्राधिकरणातील बांधकामे ठप्प पिंपरी - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) हद्द निश्‍चित होईपर्यंत नवीन बांधकाम परवानगी, पूर्णत्व दाखला अथवा मिळकत हस्तांतरासाठी ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभेने शुक्रवारी (ता. 14) घेतला. त्यामुळे या भागातील विकास आता अनिश्‍चित काळासाठी ठप्प झाला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यावसायिक, तसेच महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्त घरकुल प्रकल्पाला बसणार आहे. 

No comments:

Post a Comment