Saturday 15 September 2012

पिंपरीत चुलीवर स्वयंपाक

पिंपरीत चुलीवर स्वयंपाक: पिंपरी । दि. १४ (प्रतिनिधी)

गॅस, डिझेल दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड तसेच मावळमधील सामाजिक संस्थांनी आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. नागरी हक्क कृती समितीने चुलीवर स्वयंपाक करून भावना व्यक्त केल्या. भाजपनेही निषेध केला. सत्तेत सहभागी असणार्‍या राष्ट्रवादीनेही पिंपरी चौकात आंदोलन करून तसेच इंडियन युथ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. सरकारला घरचा आहेर दिला.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात इंधनावरील सवलत काढल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम खात्याचा निषेध करण्यात आला. ग्राहकाला घरगुती वापराचे किमान १२ सिलिंडर मिळावे तसेच डिझेलच्या दराचा फेरविचार सरकारने करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले.

‘भाववाढ त्वरित मागे घ्यावी.’ १२ गॅस सिलिंडर मिळालेच पाहिजे या घोषणा देत चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी, पक्षनेत्या मंगला कदम, शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, युवक अध्यक्ष मयूर कलाटे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, महिला अध्यक्ष सुरेखा लांडगे, फजल शेख, श्रीधर वाल्हेकर, नगरसेवक जितेंद्र ननावरे, समीर पठाण, नंदा ताकवणे, नीता पाडाळे, अरुण बोर्‍हाडे, किरण मोटे, अतुल शितोळे, शुभांगी बोराडे, वैशाली काळभोर, सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, उल्हास शेट्टी, अरुणा कुंभार, धनंजय भालेकर आदी सहभागी झाले.

मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवाढीचा निषेध केला. या वेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, मंगल भेगडे आदी उपस्थित होते. मावळ तालुक्यात दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment