Wednesday 27 February 2013

विकासकामांसाठी ५0 कोटी मंजूर

विकासकामांसाठी ५0 कोटी मंजूर: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)

वाकड ते थेरगाव, वाकड ते हिंजवडी या परिसरातील रस्त्यांच्या कामांचे सुमारे ५0 कोटींच्या खर्चाचे ऐनवेळचे प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांसह अन्य विकासकामांच्या सुमारे ६ कोटींच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जगदीश शेट्टी होते.

वाकड-थेरगाव येथील १८ मीटर रस्त्यासाठी १२ कोटी ९२ लाख ४१ हजार १५ खर्च अपेक्षित आहे. त्यासह वाकड-थेरगाव २४ मीटर रस्त्यासाठी ७ कोटी ८५ लाख १८ हजार ८३२ रुपये, वाकड-थेरगाव रस्त्यासाठी १0 कोटी ५२ लाख ७२ हजार ५१५ रुपये, विनोदेवस्ती वाकड येथील रस्त्यासाठी १२ कोटी ५१ लाख ८ हजार ७४२ रुपये आदी रस्ते विकासाच्या खर्चाचे ऐनवेळचे एकूण ४५ कोटींचे आणि विषयपत्रिकेवरील सुमारे ६ कोटींचे विषय मंजूर करण्यात आले. अशा एकूण ५0 कोटींच्या विकासकामांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. इंदिरा गांधी उड्डाणपूल ते संतोषी माता चौकापर्यंतच्या डांबरीकरणासाठी ८२ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव संमत झाला. दापोडी, सीएमई येथील लष्कराच्या हद्दीतील ७५ हजार वृक्षसंवर्धनासाठी वन खात्यास २ कोटी ४७ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली.

No comments:

Post a Comment