Thursday 28 February 2013

रेडझोन हद्दीने उडाली सामान्यांची झोप

रेडझोन हद्दीने उडाली सामान्यांची झोप: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड शहर, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी, देहूरोड कॅन्टोन्मेंटने विकास आराखड्यानुसार विकास केल्यानंतर आता लष्कराने हद्द निश्‍चितीचा नकाशा जाहीर केला आहे. प्राथमिक माहितीनुसार १५ हजार ७४ मिळकती बाधित होणार आहेत, त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांना यावर काय मार्ग काढायचा असा प्रश्न पडला आहे.

तळवडे परिसरातील रेडझोनची हद्द कमी करावी, याबाबत नुकतीच संरक्षणखात्याच्या अधिकार्‍यांशी दिल्लीत बैठक झाली. त्या वेळी लष्कराला आपले म्हणणे मांडण्यास आणि हद्दीबाबचा नकाशा सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार लष्कराने आपला नकाशा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने तो महापालिका, प्राधिकरण, देहूरोड कॅन्टोन्मेंटकडे पाठविला. नगररचना विभागांमध्ये हा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी लावला आहे. मात्र, सर्व्हे क्रमांक आणि महापालिका, प्राधिकरणातील किती क्षेत्र बाधित होते. याविषयी दोन्ही संस्थांचे अजूनही माहिती घेण्याचे काम सुरूच आहे. किती इमारती, घरे, प्लॉट बाधित होणार याची निश्‍चित आकडेवारी दोन्ही संस्थांकडे उपलब्ध नाही.

- प्राधिकरणाच्या २0 मध्ये त्रिवेणीनगर, तळवडेचा काही भाग, सेक्टर २१, २२ मध्ये देहूरोड दारूगोळा कारखान्याकडील निगडी ओटस्कीम, जेएनएनयूआरएमच्या स्कीम, प्राधिकरणाच्या स्कीम, सेक्टर २३ मधील अप्पूघर, भक्ती शक्ती शिल्प समूह परिसर, सिद्धिविनायकनगरी, सिद्धिविनायक विहार, ट्रान्सपोर्टनगरीतील पावणेदोनहजार मिळकती बाधित होणार आहेत. त्याचबरोबर रूपीनगर, तळवडे गावठाणातील भाग अधिक प्रमाणात बाधित होत आहे. तळवडे एमआयडीसी, तळवडे इन्फोटेक पार्क बाधित झाला आहे. या मिळकती २४00 पर्यंत आहेत.

No comments:

Post a Comment