Friday 22 February 2013

संकेतस्थळावर गावांच्या नावात भरमसाट चुका

संकेतस्थळावर गावांच्या नावात भरमसाट चुका: देवराम भेगडे । दि. २१ (किवळे)

नागरिकांना आपल्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचिवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या संकेतस्थळावरील यादीत किवळे , चिंचोली, तळवडे व किन्हई गावे दिसत नाहीत. गावाचे नाव टाकता येत नसल्याने अनेक नागरिक ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यापासून वंचित आहेत.

हवेली तालुक्यातील बहुतांश गावांच्या नावांत भरमसाट चुका दिसतात. तर इंग्रजी - मराठी भाषांतरामुळे अनेक नावांचा अपभ्रंश झाला आहे. जिल्हय़ातील तेरा तालुक्यांतील नागरिक त्यांच्या गावात बांधकाम करण्याचा परवाना, खरेदी जमिनीची नोंदणी सात बारा उतार्‍यावर करणे , रास्त भाव दुकानदारांकडून होणारा काळाबाजार , बेकायदा उत्खनन, गॅस सिलेंडर वितरणातील त्रुटी व गैरप्रकार , गावठाणातील व इतर अतिक्रमणे आदी. तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येत असत. त्यामुळे कार्यालयात दररोज प्रचंड गर्दी होत असे.

त्याकरिता १ जानेवारी २0१२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाने घरबसल्या तक्रारी नोंदविण्यासाठी www.collectorpunehelpline.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यानुसार तक्रारी नोंदविण्यासाठी सदर संकेतस्थळ उघडल्यानंतर तक्रार नोंदवणे हा संदेश दिसतो , त्यावर क्लिक केले असता तक्र ारदाराचे नाव , तालुका व गाव टाकण्यासाठी रकाना दिसतो. नाव टाकल्यानंतर , तालुका निवड करावा लागतो. त्यानंतर गावाचे नाव तेथील अगोदरच अस्तित्वात असलेल्या यादीतून निवड करावे लागते. मात्र हवेली तालुक्याची निवड करून किवळे , चिंचोली , तळवडे व किन्हई या गावांतील नागरिकांना तक्र ार करताना आपल्या गावचे नावच संकेतस्थळावरील गावांच्या यादीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गेले वर्षभर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित विविध विभागांशी नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन करता आल्या नाहीत, शासनाच्या एका चांगल्या सुविधेचा लाभ घेता आला नाही.

No comments:

Post a Comment