Saturday 25 May 2013

उत्कंठा आणि धडधडही..

उत्कंठा आणि धडधडही..: पिंपरी: चर्चेच्या फेर्‍या, मंत्रालय स्तरावर वारंवार होणार्‍या बैठका यातून शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघत नाही. विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहर दौर्‍यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या वेळी नेमकी काय भूमिका घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तर पक्षाच्या धोरणांबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम होईल अशा वेगवेगळ्या भूमिका स्थानिक पदाधिकार्‍यांकडून व्यक्त होऊ लागल्याने त्यांची कानउघाडणी होण्याची शक्यता व्यकत केली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

एलबीटी विरोधातील आंदोलनात हाल झालेल्या नागरिकांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावर समन्वयाचा तोडगा काढतील. अशी अपेक्षा होती. बंदच्या शेवटच्या टप्प्यात शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नागरिकांसाठी जबरदस्तीने दुकाने खुली केली जातील, असे जाहिर केले. गांधीगिरी आंदोलन केले. तर याउलट बंद पुकारलेल्या व्यापार्‍यांना आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठींबा जाहीर केला. पदाधिकार्‍यांच्या विसंगत भूमिकांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या मुद्यावर पदाधिकार्‍यांची कानउघाडणी केली जाण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment