Friday 31 May 2013

शाळा सुरू होताच गणवेश

शाळा सुरू होताच गणवेश: - शिक्षणाधिकारी अशोक भोसले यांचा दावा
पिंपरी : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी १७ जूनला गणवेश, रेनकोट, दप्तर, बूट, वह्या, पुस्तके वाटप केली जाणार आहेत. शिक्षण मंडळाने त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे वाटपात अडचण येणार नसल्याचा दावा शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी अशोक भोसले यांनी केला आहे.

शालेय गणवेश, कवायत आणि खेळ गणवेशाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रिअल एंटरप्रायजेस आणि सनराईज प्रिंट पॅक या पुरवठादारांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. १६ मे रोजी कामाचे आदेश दिले आहेत. रेनकोट तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कंपास, प्रयोगवही या शालेय साहित्याच्या खरेदीसाठी दोनदा निविदा मागवल्या. २७ पर्यंत निविदा प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.

No comments:

Post a Comment