Wednesday 26 June 2013

क्रीडाकुलमध्ये ऑलिम्पिक दिवस साजरा

क्रीडाकुलमध्ये ऑलिम्पिक दिवस साजरा: पिंपरी : देशात विविध ‘डे’ साजरे केले जातात. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा व वेगळा असलेला ‘ऑलिम्पिक दिवस’ मोठय़ा उत्साहात केला जावा, असे आवाहन निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुलाचे प्रमुख भगवान सोनवणे यांनी केले.

ऑलिम्पिक दिवसानिमित्त ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात ऑलिम्पिक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेतला. देशात ऑलिम्पिक दिवस पाहिजे त्या प्रमाणात साजरा केला जात नसल्याबद्दल सोनवणे यांनी खंत व्यक्त केली. या साठी जनजागृती करून ऑलिम्पिक चळवळ उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनवणे हे गेल्या वर्षी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेच्या दौर्‍यावर गेले होते. तेथील माहिती, स्पर्धा आयोजन, ऑलिम्पिकचे महत्त्व या विषयी त्यांनी सविस्तर माहिती देत अनुभव कथन केले. क्रीडा साहित्य, लोगो, शुंभकर, स्पर्धा व खेळाडूंची दुर्मिळ छायाचित्रे त्यांनी दाखविली. लंडन ऑलिम्पिकची झलक विद्यार्थ्यांना फिल्म दाखवून करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी त्यांनी उत्तरे दिली. या वेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment