Thursday 15 August 2013

चापेकरांचे स्मृतीशिल्प साकारणार कधी?

(संजय माने)
पिंपरी - स्वातंत्र्यलढय़ात शौर्य गाजवून बलिदान दिलेल्या चापेकर बंधुचे चिंचवड हे जन्म ठिकाण. चिंचवडगाव येथील मोरया मंदिराजवळ त्यांच्या वाड्याच्या रूपात ऐतिहासिक स्मृती जपल्या आहेत. भारतीयांवर जुलूम करणार्‍या ब्रिटिश अधिकारी रँडचा वध करणार्‍या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकरांचा पुतळा चापेकर चौकात अनेक वर्षे होता. उड्डाणपुलामुळे तो पुतळा हटविण्यात आला होता. मात्र, आता भव्य स्वरूपात चापेकर बंधुचे एकत्रित शिल्प त्या ठिकाणी साकारण्यात येत असून, हे शिल्प शौर्य, त्याग आणि क्रांतीची सदैव प्रेरणा देत राहील.

No comments:

Post a Comment