Saturday 31 August 2013

बिलाशिवाय औषध विक्री करू नका!

पुणे : औषध दुकानांना यापुढे ग्राहकांना औषधांचे बिल देणे बंधनकारक आहे. ग्राहकाला बिल नको असेल, तरी त्याचा तपशील बिल स्वरुपात ठेवणे बंधनकारक आहे. तसे न करणार्‍यांवर परवाना रद्दची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी दिली. 
झगडे पत्रकार परिषदेत म्हणाले, अनेकदा चुकीच्या अथवा बनावट औषधांची विक्री केली जाते. बहुतांश प्रकरणांत औषधांचे बिल दिले जात नसल्याने एखाद्या रुग्णाला चुकीच्या औषधामुळे आरोग्यावर विपरित परिणाम झाला तरी पुढे काही कार्यवाही करता येत नाही. तसेच एखाद्या नामांकि त कंपनीच्या नावे बनावट औषधेही बाजारात येऊ शकतात. अथवा एखाद्या नामांकित औषध कंपनीच्या औषधातही कधीकधी चुकीची मात्रा असू शकते. बिलामध्ये रुग्णाच्या डॉक्टरांचा व औषधांचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादा गैरप्रकार घडल्यास त्यावर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे झगडे म्हणाले. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment